ज्वारीच्या दरात ११०० रुपयांची वाढ
जळगाव बाजार समितीत ज्वारीला ३ हजार ३७१ रुपये क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. तीनच दिवसात ज्वारीच्या दरात ११०० रुपयांची वाढ झाली आहे. जळगाव बाजार समितीमध्ये २२०० रुपये क्विंटल एवढा भाव असलेल्या ज्वारीचा दर ३ हजार ३७१ रुपयांवर पोहोचला आहे.
ठाकरे गटाच्या दोन नेत्यांचा भाजप प्रवेश निश्चित
शिवसेना ठाकरे गटाची माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचे भाजप प्रवेश निश्चित. पुढच्या आठवड्यात या दोन नेत्यांसह समर्थकांचा होणार भाजप प्रवेश. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने रखडला होता सुनील बागुल आणि मामा राजवडे यांचा भाजपा प्रवेश.
अहिल्यानगरमध्ये घरगुती वादातून पतीची आत्महत्या
पती-पत्नीच्या वादातून पतीने केली आत्महत्या. पत्नीने ही इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न. अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील नवनागापूर येथील रात्री उशिराची घटना. पतीने स्वतःच्या छातीवर चाकूने वार करत केली आत्महत्या
जालना जिल्ह्यात 57 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद
जालना जिल्ह्यात जवळपास 57 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ही योजना सुरू झाल्यानंतर जालना जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 5 लाख 42 हजार 392 अर्ज दाखल झाले होते.
आज मिरा रोड येथे धडाडणार राज ठाकरे यांची तोफ
8 जुलै रोजी पोलिसांचा बंदी आदेश झुगारून मनसैनिकांनी आणि मराठी नागरिकांनी उत्सफूर्त मोर्चा काढला होता आणि त्याच अनुषंगाने मनसैनिक आणि मराठी नागरिकांना शाबासकीची थाप देण्यासाठी राज ठाकरे आज मिरा रोड येथे येत आहेत. मुंबईची लाईफलाईन रेल्वेत ही राज ठाकरेंच्या आजच्या सभेची चर्चा आहे.