11 C
New York

Dombivli : डोंबिवली – माणकोली ब्रिज ठरतोय हुल्लडबाजीचा अड्डा

Published:

विक्रांत नलावडे

तरुणाई ही नेहमी ऊर्जेचा स्रोत समजली जाते, पण ती ऊर्जा योग्य ठिकाणी लागणे खूप गरजेचे असते नाहीतर त्याचे परिणाम हे इतरांना भोगावे लागतात. असाच काहीसा प्रत्यय डोंबिवलीमधील (Dombivli) नागरिकांना अनुभवायला मिळतोय. डोंबिवली – माणकोली ब्रिज झाल्याने १५ मिनिटामध्ये ठाणे या प्रलोभनामुळे डोंबिवली पश्चिममधील नागरिक सुखावले खरे पण म्हणतात ना ज्याची जळते त्यालाच कळते… आधीच अरुंद रस्ता, शिवाय रेल्वेचे सिग्नल, स्थानिक बेशिस्त वाहनचालक इतके दिव्य पार केल्यानंतर डोंबिवली – माणकोली ब्रिज सुरु होतो, पण सुरु होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर गाड्या पार्क करून अल्पवयीन मुलं -मुली धिंगाणा घालताना दिसतात. रिल्स बनवणाऱ्यांची संख्या वाढत असून एखाद्या महामार्गावर अशाप्रकारे गाड्या थांबवणे, रस्ता ओलांडणे मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण ठरू शकते. शिवाय स्थानिक तरुण मुले तिथे बसून बिनधास्तपणे दारू पिण्याचे प्रमाण सरार्स वाढू लागले आहे. त्यामुळे संध्याकाळ झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक तिथे जाण्यास घाबरू लागले आहे. मध्येच कधी तरी पोलिसांचा एखादा फेरफटका तिथून होतो पण ते तेवढ्यापुरतेच…

दिवाळी सुरु झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर फटाके फोडणाऱ्यांची संख्या या ब्रिजवर वाढू लागली आहे. हातामध्ये बॉम्ब घेऊन गाड्यांवर फेकणे, रस्त्याच्या मधोमध फटाक्यांची माळ लावणे असे भयंकर प्रकार याठिकाणी होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी अगदी हाकेच्या अंतरावर तिथे राहत आहेत. या सगळ्यावर कुठे तरी आळा बसणे गरजेचे असून पोलिसांनी यावर वेळीच कडक निर्बंध आणले पाहिजे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img