22.3 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

कर्जबाजारीपणाला कंटाळून सहा महिन्यात 527 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पश्चिम विदर्भात १ ते १९ जुलै या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याच काळात झालेल्या पावसामुळे ८४ हजार ८८ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे पश्चिम विदर्भात आजपर्यंत ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ५२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे, ज्यामुळे शेती क्षेत्रातील गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

चंद्रपूर बँकेसाठी आज मतमोजणी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदान झाले आहे. आज मतमोजणी होणार आहे. चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या इमारतीत मतमोजणी होईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालकांपैकी 14 हे बिनविरोध निवडून आले आहेत.  7 जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे

अमरावती शहरात प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी, १५० किलो प्लास्टिक बॅग जप्त

अमरावती शहरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत महापालिकेने मोठी कारवाई करत कडक संदेश दिला आहे. उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग व बाजार परवाना विभागाच्या विशेष पथकाने सक्करसाथ येथील शनी मंदिराजवळील जय ट्रेडर्स या दुकानावर धाड टाकून सुमारे १५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या. कारवाईदरम्यान संबंधित दुकान सील करण्यात आले. राज्य शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई अनिवार्य आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही बंदी अत्यंत आवश्यक असून, नियमांचे पालन करणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे असे आवाहन महानगरपालिकेने केले

पुढील पाच दिवस पोलादपुर महाबळेश्वर वाहतुक बंद रहाणार

पोलादपुर आणि महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रायगड जिल्ह्यात पायटा गावचे हद्दीत मोठी दरड कोसळली आहे तर अजून ही दरडीला धोका कायम असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पंढरपूरमध्ये दहा लाखांची खंडणी स्विकारतानाचा सीसीटीव्ही समोर

पंढरपूर तालुक्यातील किरण पुरुषोत्तम घोडके याला 10 लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. फिर्यादीकडू दहा लाख रूपयांची खंडणी स्विकारतानाचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला आहे.

या प्रकरणी आरोपी किरण घोडके यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची व आमदार अभिजित पाटील यांची बदनामी थांबवण्यासाठी आरोपीने एक कोटींची खंडणी मागितली होती खंडणी. त्यातील अॅडव्हान्स म्हणून 10 लाख रुपये घेताना किरण घोडके याला पकडले. या प्रकरणी नितीन सरडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी किरण घोडके हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगार आंदोलनात सहभागी होता.

पावसाने विश्रांती घेतल्यानं नाशिकच्या धरणांमधील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटवला

– गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी केल्याने नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती ओसरायला सुरवात

– विसर्ग घटवल्याने गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट

– मात्र अद्यापही रामकुंड, गोदा घाटावरील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम

– गंगापूर धरणातून सुरूय ४४१ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग

– सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११ धरणांमधून करण्यात येतोय पाण्याचा विसर्ग

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img