वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात चढ उतार, दोन दिवसात हळदीचे दर ५०० रुपयांनी घसरले
वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात चढ उतार होत असल्याचं बघायला मिळालं,रिसोड बाजार समितीत सोमवारी कांडी हळदीला कमाल १४,६२५ आणि किमान १२,५७५ रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळाले. यानंतर दोन दिवसांत हळदीचे दर पाचशे रुपयांनी घसरले. रिसोड बाजार समितीत कांडी हळदीला कमाल १४,१८० आणि किमान १३,३०० रुपयांचे दर मिळाले. दोन दिवसात हळदीच्या दरात ५०० रुपयांची घसरन झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गणेशोत्सवात तडीपारांची नाशिक पोलिसांकडून धरपकड, 62 जणांवर गुन्हे
गणेशोत्सवात तडीपारांची नाशिक पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. 3 दिवसांत 62 जणांवर करण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास साडेतीनशे गुंडांविरोधात तडीपारची कारवाई करण्यात आली होती. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करीत शहरात वास्तव्याला असणाऱ्या ६२ गुंडांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. शहरात तडीपार गुन्हेगार वावरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे.
धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील निवासस्थाबाहेर मध्यराञीच्या दरम्यान अज्ञात कडुन गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला. यावेळी तीन राऊंड फायर करण्यात आले. घटनेनंतर सावंत यांच्या घरासमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
रोहित पवारांची चौकशी करावी; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी
मनोज जरांगे पाटील यांचे सर्व कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या वार रूममधून चालतात. त्याची चौकशी करावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पंढरपुरात केली.