एसटी बस चालकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला…
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे जळगाव जामोद आगारची बस अकोला वरून सोनाळा मार्गे जात होती. सोनाळा येथे रोड चे बांधकाम सुरू असल्यामुळे रोडच्या बाजूला खोदकाम केले आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडचण निर्माण होतं आहे. अशातच अकोला वरून जळगावजामोद ला येणाऱ्या एसटी बसचा अपघात बसचालकाच्या सतर्कतेमुळे टळला आहे…. संध्याकाळच्या सुमारास पाऊस सुरु असल्यामुळे रोड वर पाणीच पाणी साचले होते , त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती… याच वेळी रोडच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये एसटी बस अडकली होती. यावेळी एसटी बस चालकाने समय सूचकता दाखवत गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व मोठा अपघात टळला…
धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये मध्यरात्री चर्चा
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची रात्री अडीच वाजता अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. जवळपास तासभर धनंजय मुंडे तिथे होते. रात्री अडीच वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत धनंजय मुंडे मनोज जरांगे पाटील यांच्याशी विविध मुद्द्यावरून चर्चा करत होते. त्यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील अजून पुढे आला नाही. मात्र आज मनोज जरांगे पाटील यांची परळीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने परळी, अंबाजोगाई आणि माजलगाव परिसरातील मराठा बांधव येतील अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असल्याची चर्चा आहे.
सिल्लोड तालुक्यातला खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफुल; 35 ते 40 गावांचा पाणी प्रश्न मिटला
शेतीच्या सिंचनाचाही प्रश्न लागला मार्गी; जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे प्रकल्प तुडुंब भरले
ANC: मागील 3 ते 4 दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातला खेळणा नदीवर असलेला खेळणा मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आसपास असलेल्या 35 ते 40 गावांचा पाणी प्रश्न मिटलाय. शिवाय शेतीच्या सिंचनासाठी या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गात देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान झालेल्या या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील इतरही छोटे-मोठे प्रकल्प तुडुंब भरल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
रक्तदान करा मोफत व्हीआयपी दर्शन घ्या, शिर्डी साईबाबा संस्थानचा उपक्रम
शिर्डी साईबाबा संस्थानकडून रक्तदात्यांना रक्तदानाच आवाहन करण्यात आलय.. रक्तदान करा आणि साई समाधीचे व्हिआयपी दर्शन घ्या, या उपक्रमाद्वारे रक्त संकलन वाढवण्याचा मानस साई संस्थानचा आहे.. मंदिर परिसर आणि आता संस्थानच्या भक्तनिवास परिसरात देखील रक्तदानाची सुविधा सुरू करण्यात आलीय.. संस्थान मार्फत अल्पदरात दोन रुग्णालये चालवली जातात तेथे रक्ताचा तुटवडा होत असल्याने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी हा उपक्रम सुरू केल्याच सांगितलय..
हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा
भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न करणाऱ्या हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून आंदोलन केले. महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारा कडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला,राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुती मध्ये मिठाचा खडा पडला आहे.
आज दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
शनिवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा विराजमान झाले. परंतु, आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे. काल आलेला गणराया आज जाणार आहे. आणि त्याचसाठी गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून आता मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे. महापालिकेकडुन कृत्रिम तलावाद्वारे विसर्जनाची तयारी केली आहे. मुंबईत एकूण २०४ कृत्रिम तलावाची निर्मिती केली जात आहे. मुंबईतील दादर मधील शिवाजी पार्क पार्क परिसरात तीन कृत्रिम तलावाची महापालिकेकडुन निर्मिती केली जात आहे. त्यातील एक ९ फूट खोलीचा व दोन दुसरे ७ फूट तसेच पीओपी व शाडू मातीच्या मुर्तींसाठी वेगळा कृत्रिम तलाव अशी व्यवस्था करण्यात आली असुन, सर्व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज आहे.