21.7 C
New York

Ganesh Chaturthi : गणरायासाठी खास नैवेद्य

Published:

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन झालं असून भक्तांमध्ये आपल्याला जल्लोष पाहायला मिळत आहे. तसच गणपती बाप्पाच्या आगमना सोबतच गणपती बाप्पाच्या नैवेद्याची तयारी देखील घरामध्ये केली जाते. बाप्पाला मोदक फार आवडतात त्यामुळे नैवेद्यामध्ये सहसा गणपती बाप्पाला मोदक दिले जातात. मात्र गणपती बाप्पाला मोदका व्यतिरिक्त आणखीन काही गोड पदार्थ फार आवडतात, ते पदार्थ कोणते हे तुम्हाला माहिती आहेत का? या पदार्थांची यादी आज आपण जाणून घेणार आहोत.

लाडू
लाडू गणपती बाप्पाला आवडणारा दुसरा गोड पदार्थ म्हणजेच लाडू. पौराणिक कथांपासून बाप्पाप्रमाणेच मूषक राजाला देखील लाडू फार आवडतात.

श्रीखंड
तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये श्रीखंड देखील देऊ शकता. तसेच विविध पद्धतीचे ड्रायफ्रूट्स दही साखर तुम्ही एकत्र मिक्स करून श्रीखंड देखील बनवू शकता.

गणेशोत्सवाच्या मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा

नारळी भात
गणपती बाप्पांसह नारळीभात घरातील लहान मुलांना आणि मोठ्यांना देखील फार आवडतो त्यामुळे मोदक आणि लाडवांसोबत सोबत तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्यात नारळी भात समावेश करू शकता.

खीर
नैवेद्यामध्ये गणपती बाप्पाच्या आणखीन एक गोड पदार्थ म्हणजेच खीर. नारळी भात आणि लाडू यांसोबत तुम्ही नैवेद्यामध्ये बाप्पाला खीरही देऊ शकता

पुरण पोळी

हरभरा डाळ आणि त्यामध्ये गूळ मिक्स करा. तसेच यात चवीसाठी सुंठ आणि जायफळ मिक्स करा. गव्हाच्या किंवा मग मैद्याच्या पिठात तुम्ही बाप्पासाठी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवू शकता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img