20.4 C
New York

Bigg Boss Marathi: सबसे कातील गौतमी पाटील बिग बॉसमध्ये दिसणार?

Published:

Bigg Boss Marathi : यंदाचा बिग बॉस मराठीचा सीझन चर्चेत आहे. तसेच या सीझनमध्ये सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सरना देखील यंदा संधी देण्यात आलीय. म्हणून या सीझनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन देखील होत आहे. तर आता सबसे कातिल गौतमी पाटील प्रसिद्ध डान्सर देखील बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री मारणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र या चर्चेत कित्ती तथ्य आहे? यावर आपली प्रतिक्रिया गौतमीने दिली आहे.

गौतमी पाटीलने तिच्या या प्रतिक्रियेत बिग बॉस प्रवेशाच्या चर्चावर भाष्य केले आहे. बिग बॉस शोमध्ये गौतमी पाटीलला जायला आवडेल का? तिला असा सवाल विचारण्यात आला होता. यावर ती असं म्हणाली की,मी घरीच नसते. माझा बाहेरचा दौरा खूप असतो. सिनेमा आणि टीव्ही मला बघता येत नाही. या गोष्टींचा मला खूप इंटरेस्ट आहे पण, मी ते बघू शकत नाही.

असं गौतमी पाटील ने सांगितलं आहे. त्यामुळे गौतमीला ‘बिग बॉस च्या घरात जायला आवडणार नाही हे स्पष्ट झालं आहे. बिग बॉसच्या घरातील कोणत्या स्पर्धकाला गौतमी सपोर्ट करते किंवा कोणता स्पर्धक जिंकावा असं तिला वाटतं, यावर स्पष्ट भाष्य गौतमीने केलं आहे. सुरज चव्हाण या बिग बॉस स्पर्धकाला गौतमीने सपोर्ट केला आहे. ”सुरज बेस्ट ऑफ लक, तूच जिंकून ये”, अशा शुभेच्छाही गौतमीने सुरूज चव्हाणला दिला आहे.

पिंपरी चिंचवडमधील संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याला तडा, धक्कादायक Photo Viral

ती कोणाला आदर्श मानते? असा देखील सवाल तिला विचारण्यात आला होता. यावर गौतमी पाटील असं म्हणते कीं, सुरेखा ताईंनाच मी आदर्श मानते. त्यांनीच आतापर्यंत लावणी जपलीय. बरेच लोकं असं मला म्हणतात की, मी लावणी लावणी करते पण मी डिजे शो करते,असे गौतमी पाटीलने स्पष्ट केले आहे.

दरम्यान बिग बॉसमध्ये सुरज चव्हाणचा गेम अनेक प्रेक्षकांना आवडताना दिसतोय. तो ज्या प्रकारे बिग बॉसमध्ये खेळतोय. ज्या प्रकारे इतर प्रतिस्पर्धींशी भिडतोय. हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय. त्यामुळे बिग बॉस सुरज चव्हाण जिंकेल अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img