15.6 C
New York

Suicide Rate : महिलांपेक्षा पुरुष आत्महत्याची संख्या अधिक; मुंबईत 22 टक्क्यांनी वाढ, NCRB चा अहवाल?

Published:

मुंबई

कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशा विविध कारणांमुळे देशात या आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या करण्याच्या प्रमाणात झालेली वाढ मानसिक आरोग्याच्या उतरत्या आलेखाकडे निर्देश करते. एनसीआरबीच्या (NCRB) अहवालानुसार, भारतातील आत्महत्यांच्या (Suicide Rate) घटनांमध्ये दरवर्षी 2% वाढ होत आहे. तर, विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण वार्षिक 4% ने वाढले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची नोंदही होत नसल्याचा इशारा देण्यात आला आहे, यावरून ही समस्या किती गंभीर बनत चालली आहे, याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

आर्थिक राजधानी म्हणवणाऱ्या मुंबईतही गेल्या काही वर्षांत आत्महत्येचे प्रमाण २२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले. गेल्या तीन वर्षांत मुंबईत आत्महत्यांच्या घटनांमध्ये अनपेक्षित आणि चिंताजनक वाढ झाली आहे. 2020 ते 2022 बद्दल बोलायचे झाले तर आत्महत्यांमध्ये 22% वाढ झाली आहे. या कालावधीत मुंबईत आत्महत्येचे ४ हजार १७७ गुन्हे दाखल झाले आहेत. वर्षानुसार बोलायचे झाल्यास, 2020 मध्ये हा आकडा 1,229 होता, जो 2022 मध्ये वाढून 1,499 झाला. या तीन वर्षांत महिलांच्या आत्महत्येचा आकडा १,२०० इतका आहे, जो गंभीर परिस्थिती दर्शवतो. आत्महत्या केलेल्या पुरुषांची संख्या 3,765 आहे.

हा अहवाल IC3 च्या वार्षिक परिषदेत शेअर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या डेटाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. IC3 ही एक ना-नफा संस्था आहे जी जगभरातील शिक्षणावर काम करते. या अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील आत्महत्यांच्या घटनांमध्ये दरवर्षी २% वाढ होत आहे. तर, विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण वार्षिक ४% ने वाढले आहे. विद्यार्थी आत्महत्येच्या अनेक घटनांची नोंदही होत नसल्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे, यावरून ही समस्या किती गंभीर बनत चालली आहे, हे लक्षात येते.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, गेल्या दशकात 24 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींची लोकसंख्या 582 दशलक्ष वरून 581 दशलक्ष इतकी कमी झाली आहे, तर याच काळात विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण 6,654 वरून 13,044 पर्यंत वाढले आहे. तर युनिसेफच्या अहवालात असे दिसून आले आहे की, भारतात 15 ते 24 वर्षे वयोगटातील प्रत्येक 7 पैकी 1 व्यक्ती खराब मानसिक आरोग्याने ग्रस्त आहे. यात नैराश्याच्या लक्षणांचाही समावेश होतो. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी केवळ 41% लोकांनी मानसिक आरोग्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समुपदेशकाकडे जाणे योग्य मानले.

आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दशकांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतातील प्रत्येक 10 आत्महत्यांपैकी 6 किंवा 7 पुरुष आहेत. 2001 ते 2022 या काळात दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या महिलांची संख्या 40 ते 48 हजारांच्या दरम्यान राहिली. तर याच काळात आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या ६६ हजारांवरून १ लाखाहून अधिक आहे. तर 2022 मध्ये 1.70 लाखांहून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी 1.22 लाखांहून अधिक पुरुष होते. म्हणजे दररोज सरासरी ३३६ पुरुष आत्महत्या करतात. त्यानुसार दर साडेचार मिनिटाला एक माणूस आत्महत्या करत आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील आकडेवारीवरून पुरुष अधिक आत्महत्या करतात. डब्ल्यूएचओच्या मते, जगातील प्रत्येक 1 लाख पुरुषांपैकी 12.6 आत्महत्या करतात. त्याच वेळी, हा दर एक लाख महिलांमध्ये 5.4 आहे.

आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी

– 2021 मध्ये 13,089 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्या तुलनेत 2022 मध्ये 13,044 विद्यार्थी आत्महत्या झाल्या. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये नाममात्र घट झाली.

– 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये 4% वाढ नोंदवली गेली. 2021 मध्ये 1.64 लाख लोकांनी आत्महत्या केल्या, तर 2022 मध्ये 1.70 लाखांहून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या.

– 2022 मध्ये देशात आत्महत्या केलेल्या लोकांपैकी 7.6% विद्यार्थी होते. तर, शेतीशी संबंधित लोकांची संख्या ६.६% होती. म्हणजेच शेतकऱ्यांपेक्षा शेतीशी संबंधित लोक किंवा विद्यार्थी आत्महत्या करत आहेत.

– लिंगनिहाय पाहिले तर आत्महत्या करणाऱ्या पुरुष विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान गेल्या 10 वर्षांत, पुरुष विद्यार्थ्यांमधील आत्महत्यांच्या घटनांमध्ये 50% वाढ झाली आहे, तर विद्यार्थिनींमध्ये 61% वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत, महिला आणि पुरूष विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वार्षिक ५% वाढ झाली आहे.

– तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक होतात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या एक तृतीयांश घटना या राज्यांमध्ये घडल्या आहेत. या तीन राज्यांमध्ये 2022 मध्ये साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची प्रकरणे समोर आली आहेत.

– उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे आणि ते टॉप-5 राज्यांमध्ये समाविष्ट आहे जेथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जातात. 2022 मध्ये उत्तर प्रदेशात 1,060 विद्यार्थी आत्महत्या झाल्या. तर राजस्थानमध्ये ५७१ गुन्हे दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img