15.6 C
New York

Mira Bhayandar : खाडीत जोडप्याने मारली उडी, नवरा वाचला, बायको बेपत्ता

Published:

मीरा भाईंदर

मुंबई (Mumbai) अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील वर्सोवा खाडी पुलावरून एका दाम्पत्याने उडी मारल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी 10 वाजता घडली आहे. स्थानिक पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पतीला वाचवण्यात यश आले आहे, तर पत्नीचा शोध अद्याप सुरू आहे.

मीरा भाईंदरमधील वर्सोवा खाडीत एका महिलेनी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेला वाचवण्यासाठी तिच्या पतीने देखील खाडीमध्ये उडी मारली. पत्नी बुडाली असून तिच्या पतीला वाचवण्यात यश आले असून त्याला बाहेर काढण्यात आले आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती वादातून या महिलेने खाडीमध्ये उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अहमदाबादवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ब्रिजवरून वरसावे खाडीत एका जोडप्याने उडी मारली. शशिकला यादव (२८ वर्षे) आणि दिनेश यादव (३२ वर्षे) असं या पती-पत्नींची नावं आहे. शशिकला यादव आणि दिनेश यादव हे दोघे नायगाववरून या ब्रिजवर पोहोचले. अचानक या महिलेने वर्सोवा खाडीमध्ये उडी मारली. तिला वाचवण्यासाठी तिचा पती दिनेश यादव यांनी देखील उडी मारली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img