बीड
भाजपच्या (BJP) माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangeeta Thombre) यांच्या कारवर आज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. बीडच्या (Beed) केज तालुक्यातील दहिफळ वडमावली येथून केजकडे जात असताना हा प्रकार घटला.दगडफेकीत माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह चालक किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांकडून घटनेची दखल घेतली असून अज्ञातांचा शोध घेण्यात येत आहे.