11 C
New York

Shivaji Maharaj Statue : महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Published:

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj Statue) पुतळा कोसळला आहे. यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. पुतळ्याचा दर्जा निकृष्ट होता, अशा प्रकारचा पुतळा सरकारने उभा केलाच कसा काय? असा प्रश्न विचारला जातो आहे. अशात आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

निलेश राणे म्हणाले, घडलेला प्रकार दुर्देवी आहे. जे घडलं आहे ते फार दूर्भाग्यपूर्ण आहे. असं व्हायला नको होतं. ज्याची चूक असेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. कंत्राटदार असो किंवा अधिकारी असो त्यांच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. आम्ही याचा पाठपुरावाही करु. आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत. दोषींवर कठोर कारवाई नक्की केली जाईल असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

निलेश राणे म्हणाले, हा पुतळा पुन्हा या ठिकाणी उभा करण्यासाठी जे काही करावं लागेल ते तातडीने केलं जाईल, हे आश्वासन मी तुम्हाला देतो असंही म्हटलं आहे. या स्मारकाला दुर्घटनेनंतर भेट दिल्याचे फोटोही निलेश राणेंनी पोस्ट केले आहेत.

मालवण किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत वाईट घटना काल घडली. आज या पार्श्वभूमीवर किल्ले राजकोट येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई सोबतच त्याच ठिकाणी पुन्हा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहणार असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्र राज्य सरकार मधील जेष्ठ मंत्री दीपक केसरकर यांच्याशी आज चर्चा झाली. गंभीर्यता लक्षात घेता लवकरात लवकर या भव्यदिव स्मारकाच्या उभारणीसाठी सरकार युद्धपातळीवर काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एक जॉइंट बैठक लावणार असल्याचं ही त्यांनी कळवले. छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ले राजकोट येथील स्मारक हे पूर्वीपेक्षाही भव्यदिव आणि महाराजांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असेल असं निलेश राणे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img