24.6 C
New York

Passport : संपूर्ण देशात 5 दिवसांसाठी पासपोर्ट सेवा ठप्प राहणार, ‘हे’ आहे कारण

Published:

नवी दिल्ली

जर तुम्ही देखील नवीन पासपोर्ट काढण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट विभागाचे पोर्टल (Passport) 29 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद रहाणार आहे त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी 5 दिवस अपॉइंटमेंट मिळणार नाही.

याच बरोबर जर तुम्ही यापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान अपॉइंटमेंट मिळाली असेल तर तुम्हाला ती अपॉइंटमेंट दुसऱ्या तारखेसाठी पुन्हा शेड्यूल करावी लागेल अशी माहिती पासपोर्ट विभागाने दिली आहे. तसेच या कालावधी दरम्यान कुणालाही नवीन अपॉइंटमेंट मिळणार नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे पाच दिवस पोर्टलबंद राहणार असल्याची देखील माहिती पासपोर्ट विभागाकडून देण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे पाच दिवस पोर्टल बंद असल्याने याचा परिणाम प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये, अर्जदारांची पोलीस पडताळणी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कामकाजावर होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img