17.6 C
New York

Devendra Fadnavis : हर्षवर्धन पाटील-पवारांमध्ये अडीच तास खलबतं, फडणवीस म्हणाले…

Published:

मुंबई

राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाराज भाजप नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये यात शरद पवार गटाला यश आले आहे. बारामती मतदारसंघातील इंदापूरमध्येही असा प्रयत्न सुरु झाल्याची चर्चा आहे. काही नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) पक्षावर नाराज असून येत्या काही दिवसात शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रथच भाष्य केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेशाच्या चर्चा अफवा असल्याचे आधीच म्हटले आहे. त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मात्र आज पुन्हा एकदा पाटील आणि पवारांची भेट झाली. या भेटीत आगामी विधानसभेसंबंधी काय चर्चा झाली, हर्षवर्धन पाटील खरोखर भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पाटील आणि पवारांच्या आजच्या भेटीवर भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर काही जण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येत असतात. हर्षवर्धन पाटील हे मात्र आमच्यासोबतच राहतील.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोण कोणाची भेट घेत आहे, हे महत्वाचं नाही. भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात लोक प्रवेश करत आहेत. मागच्या आठवड्यात अनेकांनी प्रेवश केला. त्याआधीच्या आठवड्यातही अनेकांनी प्रवेश केला. यापुढेही भाजपात प्रवेश होतील. हे खरं आहे की निवडणुकीच्या काळात काहीजण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येतात. मात्र, मला विश्वास आहे की, हर्षवर्धन पाटील असतील किंवा आमचे इतर नेते आमच्याबरोबरच राहतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img