11 C
New York

Dahi Handi : गोविंदा आला रे! प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीला गौतमी पाटीलची हजेरी

Published:

मुंबई

राज्यभरात आज दहीहंडी उत्सव (Dahi Handi) पार पडतोय. मानपाड्यात प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचं पाहायला मिळतंय. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये नृत्यांगणा गौतमी पाटिलने (Gautami Patil) देखील हजेरी लावली. त्यामुळे गोविंदांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. या दहिहंडीसाठी लाखो रुपयांचं बक्षीस देखील ठेवण्यात आलंय. नृत्यांगना गौतमी पाटीलची आज देखील क्रेझ कायम आहे. मानपाड्यात गौतमीनं दहीहंडी उत्सवात नृत्य देखील केलंय

मुंबईसारख्या झगमगाटी दुनियेच्या शहरामध्ये गौतमीची क्रेझ कायम असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने गोविदा पथकांना सुरक्षा कवच दिल्यापासून गोविदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मानपाडामध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह मोठ्या उत्साहात आयोजन केले गेलंय. ढोल ताशा पथक असेल मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव पार पडत आहे. थरावर थर चढवत गोविंदा दहीहंडीला सलामी देत असल्याचं देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img