20.4 C
New York

Women T20 World Cup : विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधार कोण?

Published:

नवी दिल्ली

बीसीसीआय (BCCI) अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने आगामी महिला T20 विश्वचषक 2024 साठी (Women T20 World Cup) भारतीय महिला संघाची घोषणा (Team Indias Squad) करण्यात आली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघात अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. मराठमोळ्या स्मृती मंधाना हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शेफाली वर्मा, राधा यादव आणि जेमिमा रोड्रिग्ज यांनाही टीम इंडियात स्थान मिळाले आहे. महिला T20 विश्वचषकाची सुरुवात 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारताचा सलामीचा सामना न्यूझीलंडच्या महिला संधासोबत होणार आहे. हा सामना 4 ऑक्टोबर रोजी यूएईमध्ये होणार आहे.

महिला T20 विश्वचषकातील भारतीय संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, ऋचा घोष आणि यास्तिका भाटिया या अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, हेमलता, शोभना आणि राधा यादव यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल.

T20 विश्वचषकासाठी महिला भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्टिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी , रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन

टीम इंडियाचं वर्ल्ड कप वेळापत्रक

विरुद्ध न्यूझीलंड, 4 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई

विरुद्ध पाकिस्तान, 6 ऑक्टोबर, दुपारी 3.30, दुबई

विरुद्ध श्रीलंका, 9 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 13 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, शारजाह

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img