11 C
New York

ST Bus Strike : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाचा इशारा

Published:

मुंबई

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या (ST Bus Strike) पावित्र्यात आहेत. कृती समितीला आश्वासन देऊनही निर्णय न झाल्याने एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) जाणार आहेत. ३ सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली. 3 सप्टेंबरनंतर गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात होत आहे. परिणामी ऐण सनासुदीत प्रवाशांचे हाल होणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिका-यांनी दिला आहे.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्र परिवहन मंडळाचा आशिया विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ही कृती समिती तयार झाली आणि २०१६ पासून आमची मागणी राज्यकर्त्यांपर्यंत आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतानाच त्यांनी कामगारांनाही न्याय द्यावा. वेतन आयोगाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यकाळ जाहीर करून वेतनाप्रमाणे वेतनवाढ करावी, अन्यथा एसटी कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून 3 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन छेडतील, असे संकेत त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली. याची दखल घेऊन मागील सात तारखेला कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक पार पडली. त्यात धोरणात्मक बाबीवर चर्चा झाली. तसेच पुढच्या कॅबिनेटमध्ये कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजून कुठलीही कृती समितीच्या माध्यमातून आज राज्यभरात आक्रोश आंदोलन पार पडत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img