17.6 C
New York

Maharashtra Bandh : शरद पवार, काँग्रेसनंतर आता ठाकरेंचाही निर्णय झाला; महाराष्ट्र बंद मागे, पण…

Published:

मुंबई

मुंबई हायकोर्टाचा (Mumbai High Court) निर्णय आम्हाला मान्य नाही. कोर्टाचा आदर करुन आम्ही महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) मागे घेत आहोत. पण आम्ही उद्या तोंड बंद करुन आणि काळ्या फित्या बांधून निषेध नोंदवू अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्पष्ट केली. शिवसेना भावनाबाहेर उद्या सकाळी 11 वाजता आंदोलनाला बसणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीचे सर्व नेते बाहेरगावी आहेत. त्यामुळे आमची फोनवर चर्चा झाली. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळे झेंडे घेऊन निषेध नोंदवतील. मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. पण शनिवार-रविवार आल्यामुळे इतक्यात जाता येत नाही.

आज दुपारी उद्याच्या बंद बाबत मी तुमच्याशी बोललो. उद्याच्या बंद बद्दल काही सूचना आज दिल्या होत्या. उद्याचा बंद विकृती विरोधी होता. होता हा शब्द वापरतो कारण कोर्टाने तत्परतेने या बंदला मनाई केली आहे. एका गोष्टीचं बरं वाटलं. कोर्ट एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे कौतुकास्पद आहे. तुम्ही तत्परतेने निर्णय दिला, तशीच तत्परता तुम्ही जे गुन्हे घडता त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठीही दाखवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केलं.

कोर्टाचा निर्णय मान्य नाही. पण कोर्टाचा आदर ठेवावा लागतो. आम्ही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. पण कोर्टात जाणं आणि निर्णय मिळण्याला अवधी जाऊ द्यावा लागतो. बंदचं कारण वेगळं होतं. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील उद्रेक उफाळला तर सर्वांना कठीण होईल. पवारांनी आवाहन केलं आहे. आम्हीही बंद मागे घेत आहोत. पण गावात आणि शहरातील मुख्य चौकात आघाडीचे नेते कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती लावून निषेध करतील. आम्ही तोंडच बंद करू. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? मोर्चे हडताळ यावर बंदी आहे का? लोकांनी भावना व्यक्त करू नये का. यावर घटनातज्ज्ञांनी बोललं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img