11 C
New York

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाचा नकार, नाना पटोले म्हणतात…

Published:

मुंबई

बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) या बंदला मनाई केली आहे. याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाने पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे, असेही स्पष्ट केले आहे. मात्र यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणतात, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. परंतु जनसामान्य म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नाना पटोले म्हणाले की, सध्याच्या काळात शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या मुली महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत. सरकार आमचं ऐकायला तयार नाही. प्रशासन सरकारच्या दबावाखाली आहे. अशा परिस्थितीत बदलापूरमध्ये जनसामान्यांनी आंदोलन केले आहे. त्यामुळे आम्ही करणारं आंदोलन राजकीय नाही, हे आम्ही आधीच सांगितलं आहे. आम्ही उद्याच्या आंदोलनात उतरणार आणि शांतपणे करणार आहोत.

नाना पटोले म्हणाले की, आम्ही कोणालाही जबरदस्ती दुकान बंद किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही. स्वयंपूर्तींनी या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची भूमिका जनतेला घेता येते. राजकीय पक्षाला भूमिका घेता नाही, अशा न्यायालयाच्या वक्तव्याचा आम्ही सन्मान करतो. पण मी पण एक सामान्य माणूस आहे. नंतर काँग्रेस पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे. पण जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं ते मी एक सामान्य माणूस म्हणून सहन करणार नाही. लोकशाहीमध्ये माझ्या संविधानाने मला जे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारामध्ये मला माझ्या जनभावना मांडायला कोणीही थांबवू शकत नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी स्पष्ट केली.

नाना पटोले म्हणाले की, मी पहिला इथला नागिरक आहे. जनसामान्य व्यक्ती आहे. मी ज्या भावना बदलापूरमध्ये तेथील जनतेच्या पाहिल्या, पीडित कुटुंबाच्या ऐकल्या, त्या भावनेच्या आधारावर, मी पक्षाचा नेता नंतर पहिलं मला संविधानात व्यक्ती स्वातंत्र्याचे जे अधिकार दिलेले आहेत, त्याचा मी गैरफायदा घेणार नाही. पण हे सरकार आंधळ भैरं झालेलं आहे. त्यामुळे या सरकारसमोर आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत आणि आम्ही त्या करू, असेही नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, आम्ही न्यायालयाचा अवमान राजकीय पक्ष म्हणून करणार नाही. आम्ही न्यायालयाचा निर्णयाचा सन्मान ठेवणार. जनसामान्यांनी बदलापूरमध्ये आंदोलन केलं आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. 300 लोकांवर पोलिसांनी कारवाई केली. शाळा आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांवर कारवाई केली. जनभावना मांडायला न्यायालयाचा नकार नाही. राजकीय पक्षाला बंद करता येणार, असे असेल तर आम्ही आमचे झेंड लावणार नाही. कारण या महाराष्ट्राच्या जनतेचं उद्याचं आंदोलन राहणार आहे. महाराष्ट्रातील जनता या सरकारच्या विरोधात चिडलेली आहे. त्यामुळे या आंदोलामध्ये मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही, तर एक जनसामान्य म्हणून आणि आमचे सर्व लोक जनसामान्य म्हणून आंदोलनात सहभागी होतील, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img