24.6 C
New York

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Published:

छत्रपती संभाजीनगर

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका (Assembly Elections) होणार आहे. त्यापूर्वी राजकारण सुरु झाले आहे. अद्याप निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला नाही. मात्र त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अंतरवलीमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आगामी विधानसभा निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे. आता माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले नाही तर राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्याबाबत सरकारला इशारा देखील दिला आहे. यामुळे जरांगे पाटील यांची तयारी सुरु झाली असून दौरे देखील वाढले आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय निर्णयामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आता नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी वाढवल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी या जालन्यातील गावामध्ये पृथ्वीराज चव्हाण दाखल झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी राजकीय बातचीत झाल्याची चर्चा रंगली आहे

आगामी विधानसभा निवडणूका लढण्याबाबत मनोज जरांगे पाटील हे निर्णय घेणार आहेत. याबाबत जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्ट रोजी निर्णय जाहीर करणार होते. मात्र त्यांनी त्यांच्या घोषणेची तारीख पुढे ढकलली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच आम्ही थेट उमेदवारांची नावे सांगून यांना पाडा असे सांगणार आहे. किंवा मराठा समाजाचा उमेदवार उभा करणार आहे. त्यामुळे युतींचे टेन्शन वाढले. जरांगे पाटील यांनी इच्छुकांचे अर्ज देखील मागवले आहेत. जरांगे पाटील स्वतः त्यांची मुलाखती घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घरी जाऊन भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाबाबत देखील चर्चा झाली आहे. कारण चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img