24.6 C
New York

Mahila Congress : कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महिला काँग्रेस दंडुके घेऊन रस्त्यावर उतरणार

Published:

रमेश औताडे, मुंबई

राज्याला एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असूनही ते महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, यातून लहान मुलीही सुटलेल्या नाहीत. महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महिला काँग्रेस (Mahila Congress) दंडुके घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे (Sandhya Savvalakhe) यांनी दिला आहे.

राज्यातील महिला अत्याचाराच्या एका घटनेत तपास करून दोन महिन्यात आरोपीला फाशी ! असे मुख्यमंत्री शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितले. ही घटना कोणती व कोणाला फाशी दिली त्याचा खुलासा करावा व बदलापूरच्या नराधमालाही तातडीने फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

बदलापूरसारख्याच घटना अकोला, नाशिक, ठाणे जिल्ह्यात घडल्या आहेत. राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना व निष्क्रीय सरकार लक्षात घेऊन प्रदेश महिला काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात नारी न्याय समिती स्थापन करणार आहे. या समितीत एक महिला वकील व पाच महिला सदस्य असतील, पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत तसेच समुपदेशन करण्याचे काम ही समिती करेल, अशी माहिती संध्या सव्वालाखे यांनी दिली .

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img