19.4 C
New York

Cristiano Ronaldo: स्टार फुटबॉलरने केला यूट्यूबवर नवा विक्रम

Published:

निर्भयसिंह राणे

फुटबॉल सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) पुन्हा एकदा डिजिटल क्षेत्रात आपला जागतिक प्रभाव दाखवला आहे. 39 वर्षीय फुटबॉल आयकॉन, जो खेळपट्टीवर त्याच्या उत्तम कामगिरीसाठी जाणला जातो, त्याने आता 10 मिलियन सबस्करायबर्स पोहोचण्यासाठी सर्वात वेगवान YouTube चॅनलचा विक्रम बनवला आहे.

रोनाल्डोने त्याचे YouTube चॅनल, UR Cristiano, बुधवार 21 ऑगस्ट रोजी लॉंच केले आणि जगभरातल्या चाहत्यांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. चॅनेलने अनेक व्हिडिओंसह पदार्पण केले, ज्यात टीझर ट्रेलर, त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जसह एक मनोरंजक क्विझ गेम आणि रोनाल्डोची मॅडम तुसाद येथे त्याच्या मेणाच्या स्टॅचुची भेट घेतल्याची क्लिपचा समावेश आहे.

Darius Visser : T20I मध्ये एक षटकात 39 धावा केलेल्या समोआविरुद्ध वानूआतूचा मनोरंजक सामाना

विशेष म्हणजे 90 मिनिटाच्या आत रोनाल्डोच्या चॅनलने 1 मिलियनहून अधिक सबस्करायबर्स मिळवले जे आत्तापऱ्यंतचे सर्वात वेगवान आहेत. अवघ्या सहा तासांत, चॅनलच्या सबस्करायबर्सची संख्या 6 मिलियनच्या वर गेली आणि दिवसाखेरीस ती संख्या 10 मिलियनच्यावर गेली. रोनाल्डोचे चॅनल जे सध्या 16 मलियनच्या जवळ आहे ते वेगाने वाढत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img