17.6 C
New York

Assembly Elections : मनसेत राडा, ‘या’ दोन उमेदवारांची घोषणा

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपला (BJP) जाहीर पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) मात्र भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच याबाततची घोषणा स्वत: राज ठाकरेंनी केली होती. पण एवढ्यावरच न थांबता राज ठाकरेंनी थेट विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर (MNS Candidate Declared) करणंही सुरू केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेने आपले 4 उमेदवार हे जाहीर केले होते. आज (22 ऑगस्ट) मनसेने त्यांचा विदर्भातील दोन उमेदवार देखील जाहीर केला आहे.  त्यामुळे, विधानसभेसाठी मनसेकडून (MNS) आत्तापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये, चंद्रपूर विधानसभेसाठी मनदिप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, यापूर्वी मराठावाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी 4 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, विदर्भ दौऱ्यात 2 उमेदवारांची घोषणा झाल्याने मनसेनं विधानसभेचा षटकार ठोकल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांत आघाडी घेत मनसेचे 6 उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेतल्याचेही स्पष्ट होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांचा 26 ऑगस्टपर्यंत विदर्भ दौरा असणार आहे. राज ठाकरे यांचा आज चंद्रपुरात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण त्यांच्या बैठकीनंतर ते पुढच्या दौऱ्यासाठी निघताच सभागृहातच मनसेच्या दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना हाणामारी केली. ही हाणामारीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

राज ठाकरे यांची चंद्रपुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. त्यांच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांच्या दोन गटात मोठा राडा झाला. या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी सचिन भोयर यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. पण त्यांच्या उमेदवारीला पक्षाचेच पदाधिकारी चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी विरोध केला. त्यामुळे भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. या हाणामारीची घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तीन उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरेंचे विश्वासू बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवडी विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरणार आहेत. तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. तर वरळीतून संदीप देशपांडे यांनाही तिकीट देण्यात येणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img