17.6 C
New York

Bigg Boss Marathi 5 : जान्हवीकडून पंढरीनाथ कांबळेंचा अपमान, नेटकऱ्यांनी जान्हवीवर जोरदार टीका

Published:

‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 5) घरात दोन्ही गटांमध्ये जोरदार भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी जान्हवी किल्लेकरने पुन्हा एकदा घरातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) पु्न्हा घरातील इतर सदस्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे (Paddy Kamble) यांच्या अभिनयाबाबत करिअरच्या मुद्यावर अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याने नेटकऱ्यांनी जान्हवीवर जोरदार टीका केली आहे.

बीबी करन्सीसाठी बिग बॉसच्या घरात नुकताच टास्क पार पडला. यामध्ये सदस्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली. जान्हवीने पॅडीबद्दल लाजिरवाणं भाष्य केलं. पॅडीवर टीका करताना जान्हवीने पातळी सोडली, यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. नेटकऱ्यांनी जान्हवीला चांगलंच निशाण्यावर धरलं आहे. टीकांचा भडीमार सहन करणाऱ्या जान्हवीसाठी आता नवरा मैदानात उतरला आहे.

दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात बोलताना दिसल्या. टास्क झाला तसेच या टास्कमध्ये कोणीही जिंकले नाही. दोन्ही टीमला झिरो पॉईंट मिळाले आहेत आणि याचे गंभीर परिणाम उद्यापासून दोन्ही टीमला भोगावे लागतील बिग बॉसकडून स्पष्ट करण्यात आले,. बिग बॉसच्या घरात यानंतर पुढे राडा होताना दिसतोय. जान्हवी आणि पॅडीमध्ये वाद होतो. यावेळी जान्हवी ही थेट म्हणाली की, पॅडी दादा आयुष्यभर अशी ओव्हर अॅक्टिंग करून थकले आहेत. मात्र, घरातील सदस्यांना जान्हवी हिचे पॅडी कांबळेच्या करिअरबद्दल बोलणे अजिबातच आवडले नाही. यावेळी पॅडीही जान्हवीबद्दल बोलताना दिसले.

जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) हिच्यावर पॅडीबाबत (Paddy Kamble) लाजिरवाणं भाष्य केल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरु आहे. त्यानंतर आत जान्हवीसाठी नवरा मैदानात उतरला आहे. ट्रोलर्सने निशाण्यावर धरल्यानंतर जान्हवीच्या पतीची प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉस मराठी घरातील घडामोडींवर जान्हवी किल्लेकरच्या पतीने अधिकृत निवेदन जारी केलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त घटनांवर, जान्हवी किल्लेकरच्या पतीने यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img