19.2 C
New York

Badlapur Rape Case : बदलापूरच्या घटनेतील आरोपीच्या घराची अज्ञातांकडून तोडफोड

Published:

बदलापुर

बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार (Badlapur Rape Case) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सध्या महाराष्ट्रसह देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या घटनेविरोधात काल बदलापूरमध्ये पालकांनी तीव्र रेल रोको आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज आरोपी अक्षय शिंदेला (Akshay Shinde) न्यायालयात हजर केल्यानंतर 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व येथील खरवई गावात राहणारा आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अक्षय शिंदे च्या शेजारी राहणारे नातेवाईकांची घराची तोडफोड देखील यावेळी करण्यात आली आहे. या घटनेनंतर अक्षयच्या कुटुंबीयांनी घर सोडून गायब झाले आहे. तसेच अक्षयचे यापूर्वी तीन लग्न झाले असल्याची माहिती देखील अक्षयच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी प्रसार माध्यमांची बोलताना सांगितले आहे.

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला फाशी देण्याची आंदोलकांची मागणी आहे. आरोपीला आज कोर्टात हजर केले असता २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी कोर्टाला विनंती केली होती की, आरोपीने आणखी काही मुलींवर अशाच प्रकारे शोषण केले आहे याची चौकशी करायची आहे. त्याच्यासोबत आणखी कोणी होतं का याचा देखील शोध घ्यायचा आहे. त्यावर कोर्टाने आरोपाला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बदलापूर घटनेचे पडसाद दिल्लीत देखील पाहायला मिळाले. केंद्रीय बालहक्क आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img