17.6 C
New York

Badlapur : ‘फाशी…फाशी…’; सरकारचे ‘संकटमोचक’ समोर येतात आंदोलकांकडून घोषणाबाजी

Published:

बदलापूर

बदलापूर येथील (Badlapur) एका शाळेतील दोन छोट्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असून ही घटना समोर आल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकात पालकांचं आंदोलन सुरु आहे. तुम्हाला जे हवं तेच होईल, नराधमाला फाशीच (Badlapur School Case) दिली जाणार असल्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी बदलापुरकरांना देऊनही आंदोलनकर्त्यांवर काहीच परिणाम होत नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, बदलापूर अत्याचार घटनेप्रकरणी नराधमाला फाशीचीच शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलन केलंय. मागील पाच तासांपासून हे आंदोलन सुरु असून रेल्वे लाईन ठप्प झालीयं. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी सरकारकडून मंत्री महाजन मैदानात उतरले मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडल्यांच दिसून आलं आहे. अद्यापही आंदोलकांकडून आंदोलन सुरुच आहे.

गिरीश महाजन म्हणाले, काही दिवसांत घटनेचा तपास पूर्ण होईल, त्यानंतर तुम्हाला जे हवं आहे तेच होईल आंदोलकांमधून कोणी एकाने आमच्यासोबच चर्चा केली पाहिजे त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करायला वेळ लावला आम्हाला मान्य आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली. जे पोलिस दिरंगाई करीत होते त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. चिमुकल्यांना नक्कीच न्याय मिळेल, विश्वास ठेवा अशी साद महाजन यांनी आंदोलकांना घातली. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत.

तसेच एसआयटी चौकशीमध्ये पोलिसांनाही सोडलं जाणार नाही. तुमचा राग रास्त आहे आमची बाजू समजून घ्या. तुम्हाला हवं तेच होईल, असं आश्वासन महाजनांकडून देण्यात आलं, मात्र या आश्वासनांचा काही उपयोग झाला नाही. गिरीश महाजनांसमोरच आंदोलकांनी नराधमाला फाशीचीच शिक्षा देण्याच्या घोषणा करण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img