15.6 C
New York

Badlapur : बदलापूरातील आंदोलनाचा रेल्वेला फटका; पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेस पनवेल मार्गाने वळविल्या

Published:

बदलापूर येथील एका शाळेत मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या नागरिकांना बदलापूर (Badlapur) स्थानकात जोरदार रेल रोको केल्याने लोकल गाड्यांसह लांबपल्ल्याच्या (Railway staion) गाड्यांचाही खोळंबा झाला आहे. सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरु झालेल्या या रेल रोकोवर अजूनही तोडगा न निघाल्याने मध्ये रेल्वे ठप्प झाली आहे. अंबरनाथ आणि कर्जत दरम्यानच्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याने हातावर पोट असणार्‍या सामान्य गरीब लोकांचा व्यवसाय बुडाला आहे. या मार्गावरील लांबपल्ल्याच्या ट्रेनना आता कर्जत मार्गे व्हाया पनवेल ते सीएसएमटी वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत सकाळी पोहचणाऱ्या इंटरसिटी गाड्यांतील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

बदलापूरातील एका प्रतिष्ठीत शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलींवर शाळेत अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन मुली लघुशंकेसाठी जाताना हा घृणास्पद प्रकार शाळेतील एका कर्मचाऱ्याने केला आहे. त्यामुळे शाळेवरील विश्वासाला तडा गेला आहे. या शाळेतील व्यवस्थापनाविरोधा बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याने संतप्त पालकांनी शाळेला घेराव घातला होता.त्यानंतर शाळेची तोडफोड करण्यात आली आहे. आज मंगळवारी बदलापूर स्थानकात आंदोलकांनी शिरकाव ‘रेल रोको’ केला. या प्रकरणाला मध्य रेल्वेच्या डीआरएम यांनी बाह्य कारणांनी मध्य रेल्वे अंबरनाथ आणि कर्जत दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर धावू शकत नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. बदलापूर स्थानकात रेल्वे रोको सुरुच मध्य रेल्वेने लांबपल्ल्याच्या गाड्यांना कर्जत- पनवेल मार्गाने वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणात आंदोलकांची गर्दी पांगविण्यासाठी आणि स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार विनंती करून आंदोलक माघार घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीनंतर पोलिसांनी काढता पाय घेतला आहे. दगडफेकीत तीन ते चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या मेल – एक्सप्रेस कर्जत- पनवेल मार्गे वळविल्या
1) 22159 CSMT – MAS Express JCO 20.08.2024

2) 12263 Pune – NZM DURANTO EXP JCO 20.08.2024

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img