24.6 C
New York

Badlapur : बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा लाठीचार्ज, तब्बल दहा तासांनी रेल्वे मार्ग केला मोकळा

Published:

बदलापूर

बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur School Case) झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. बदलापूरकरांनी (Badlapur) सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत रेल्वे मार्ग रोखून धरला होता. आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या 8 तासांपासून नागरिक बदलापूर रेल्वे स्टेशनवर (Badlapur Railway Station) आंदोलन करत आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. यावेळी काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूर रेल्वे स्टेशनवर हजारो आंदोलक आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आंदोलन करत होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पुन्हा एकदा लाठीचार्ज करण्यात आला आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनवर हजारो आंदोलक आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आंदोलन करत होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पुन्हा एकदा लाठीचार्ज करण्यात आला आहे. आंदोलकांनी हे आंदोलन मागे घ्यावा यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रयत्न केला होता.

गिरीश महाजन तब्बल एक तास आंदोलकांशी चर्चा करत होते मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे सायंकाळी 6 च्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवलं. सध्या पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात येत आहे. तर दुसरीकडे बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच सरकारने या प्रकरणात पहिली कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाकडून देण्यात आली आहे.

गेल्या नऊ ते दहा तासांपासून बंद असलेली लोकल सेवा सुरू करणे आवश्यक होते. आता मार्ग मोकळा झाला असून रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी योग्य स्थिती निर्माण करायची आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img