17.6 C
New York

Niroshan Dickwella : डोपिंग टेस्ट उल्लंघनामुळे श्रीलंकेचा निरोशन डिकवेला निलंबित

Published:

निर्भयसिंह राणे

श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) डोपिंग उल्लंघनामुळे निलंबित करण्यात आला आहे, अशी एसएलसीने (SLC) अधिकृत प्रकाशनात पुष्टी केली. यंदाच्या लंका प्रीमियर लीगदरम्यान श्रीलंकेच्या अँटी डोपिंग एजन्सीने ही चाचणी घेतली. डिकवेला यांचे निलंबन तात्काळ लागू झाले आहे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत ते कायम राहील.

IPL 2025 : बीसीसीआय आणणार हा नियम परत ज्यांनी सीएसकेला होणार फायदा

“क्रिकेट मंत्रालयाच्या सहकार्याने आणि जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी एजन्सी (WADA) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हाती घेण्यात आलेला हा उपक्रम, क्रिकेट प्रतिबंधित पदार्थांच्या प्रभावापासून मुक्त राहील याची खात्री करणे हा आहे,” असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

SLC, क्रीडा मंत्रालय आणि SLADA सोबत, डोपिंग विरोधी पॉलिसी ही खेळापासून डोपिंगला दूर ठेवण्यासाठी नियमितपणे ह्या चाचण्या करते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img