24.6 C
New York

Congress Melava : मुंबईत काँग्रेसचा भव्य मेळावा; उद्धव ठाकरेंसह ‘हे’ मोठे नेते उपस्थित राहणार

Published:

मुंबई

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्टला मुंबईच्या (Mumbai) षण्मुखानंद सभागृहात दुपारी 3 वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस (Mumbai Congress) कमिटीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा (Congress Melava) आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगेजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

दरम्यान काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला आहे, या मेळाव्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. आता काँग्रेसच्या मेळाव्यातून विरोधक सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे.

लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला महत्वाचे स्थान आहे, सत्तापक्ष व विरोधपक्ष ही लोकशाहीची दोन चाके आहेत पण स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना योग्य स्थान दिले नाही, हा लोकशाहीचा खून आहे. भाजपामध्ये सत्तेची घमेंड व गर्व अजून आहे, विधानसभेच्या निवडणुकीत ही अहंकारी प्रवृत्ती सत्तेतून बाहेर काढली पाहिजे. असं पटोले म्हणाले.

महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर महत्वाचे भाष्य केलंय. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुद्दामून हा प्रश्न टाकलाय. त्यांच्या माध्यमातून आता हा विषय चर्चेत राहील, पण मुख्यमंत्री चेहरा कोण असेल हे जेष्ठ नेते मिळून ठरवतील आणि अंतिम निर्णय घेतील. असे म्हणत नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे एका वाक्यात सांगितलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img