नवी दिल्ली
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या (National Awards 2024) विजेत्यांची घोषणा केली. सर्वोत्कृष्ट चित्रपटापासून सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रीपर्यंत अनेक श्रेणींमध्ये हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे. मराठीत वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, हिंदीत गुलमोहर चित्रपटाने बाजी मारली आहे. “सर्वोत्कृष्ट कथन ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ ला जाहीर करण्यात आला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये वाळवी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे. साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘कंतारा’ या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
ऋषभ शेट्टीच्या कांतारा चित्रपटाने यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बाजी मारली आहे. ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. तर कांतारा चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. यंदा बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नाही. नित्या मेनन (Thiruchitrambhalam) आणि मानसी पारेख (Kutch Express) यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली असून साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला बेस्ट डॉक्यु्मेंटरी आणि बेस्ट नॅरेशन असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सचिन सुर्यवंशी यांच्या वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर आदीगुंजन या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – अट्टम
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन आणि मानसी पारेख
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सूरज बडजात्या
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म होलसम एंटरटेनमेंट – कांतारा
सर्वोत्कृष्ट पदार्पण – फौजा, प्रमोद कुमार
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – सौदी वेलाक्का
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – PS1
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – KGF2
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी -Mumars of the Jungle
दिग्दर्शक आणि प्रोड्युसर – साहिल वैद्य