15.6 C
New York

Narayan Rane : नारायण राणेंच्या अडचणी वाढणार? कोर्टाने थेट नोटीस पाठवली, नक्की प्रकरण काय?

Published:

मुंबई

रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sidhudurg Lok Sabha) मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) वादात सापडली आहे. ही निवडणूक भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी भ्रष्ट मार्गाने जिंकल्याचा दावा करणारी याचिका शिवसेना उध्वव ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) दाखल केली होती. त्यावर कोर्टाने शुक्रवारी राणेंना नोटीस बजावली आहे.

राऊत यांनी राणे पितापुत्रांवर गंभीर आरोप याचिकेत केले आहेत. राणेंचा निवड रद्द करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने राणेंसह निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे. न्यायाधीश सारंग कोतवाल यांच्या खंडपीठीसमोर ही सुनावणी सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी राऊतांचा पराभव केला आहे. त्यानंतर राऊतांनी राणेंविरोधात याचिका दाखल केली आहे. राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यास आणि मतदान करण्यास बंदी लादण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.

नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणुक आयोगाने चौकशी करावी, अशी विनंती राऊतांनी केली आहे. कोर्टाच्या नोटीशीला राणे काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल.

मुंबईतील उध्दव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांनीही शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या विजयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कीर्तीकरांचा केवळ 28 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे या याचिकेबाबतही उत्सुकता वाढली आहे. दोन्ही याचिकांवर हायकोर्टाकडून काय निकाल येणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img