26.5 C
New York

Mohan Bhagwat : बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यावरून सरसंघचालक संतापले, म्हणाले…

Published:

नागपूर

नागपूर येथील संघाच्या मुख्यालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावला. सरसंघचालकांनी ध्वजारोहण केल्यानंतर बांगलादेशमध्ये (Bangladesh) हिंदूवर होत असलेल्या हल्ल्यांवर आपले मत व्यक्त केले. काही देशांमध्ये विनाकारण हिंदुंना त्रास सहन करावा लागत आहे. भारताने कधी कोणावर आक्रमण केले नाही उलट मदत करण्याचे काम भारताने केलं आहे. असे मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. अनके प्रकारच्या लोकांनी स्वतंत्र्य लढ्यात योगदान दिले. देशासाठी बलिदान देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण फक्त तेच लढले नाहीत. तर सामान्य व्यक्तीही देशाच्या लढ्यात रस्त्यावर उतरली. त्यांनी कारावास भोगला. ज्याच्याकडून काहीच झाले त्यानी घरात राहून वंदे मातरम गायले. मोठ्या परिश्रामाने ही स्वतंत्रता मिळाली आहे.

मोहन भागवत म्हणाले की, देशाची रक्षा करण्यासाठी सतत सजग राहावे लागते. संविधानिक अनुशासनाचे पालन करावे लागते. परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही. पण देशातील सामान्य व्यक्ती देशाची रक्षा करायची आहे हे मनात ठेवून चालतो. त्यामुळे एक वातावरण निर्मिती होते आणि स्वातंत्र्य सुरक्षित राहते. काही देशात विनाकारण हिंदू ना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. भारताने कधी कोणावत आक्रमण केले उलट मदत करण्याचे काम केलं आहे. असे मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले की, बांगलादेशमध्ये सध्या हिंदूवर होत असलेल्या हल्ल्यांवर देखील त्यांनी नाव न घेता मत व्यक्त केले आहे. जगभरातील दुःख पीडितासाठी आपले सरकार काम करते. ज्या ठिकाणी अस्थिरता आहे त्याठिकाणी अत्याचार होऊ नये ही जबाबदारी आपल्या देशावर आहे. सरकारला ही शक्ती तेव्हा मिळेल. जेव्हा समाज त्या भावनेतून जगेल. देशाला आपण शुभेच्छा देत आहोत. पण कर्तव्याची आठवण करण्याचे काम आपले आहे. बांगलादेशमधील परिस्थिती सरकारनं काम करेल पण भारतीयांनी सुद्धा कसं वागावं असा संदेश आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img