26.5 C
New York

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा पहिला उमेदवार ठरला?

Published:

जालना

मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 ऑगस्टपर्यंत विधानसभेसाठी (Assembly Election) इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येऊन भेटावं, असं आवाहन केलं आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी राज्यभरातून अनेक इच्छुक आंतरवाली सराटी दाखल झाले होते. त्यात नांदेडमधील काही जणांचा सहभाग आहे. माजी खासदार भास्करराव खतगावर (Bhaskar Khatgaonkar) यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर (Dr. Minal Khatgaonkar) यांनीही जरांगे-पाटील यांनी भेट घेतली आहे.

भाजपचे माजी खासदार भास्कर खतगावकर यांच्या सून मिनल खतगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि विधानसभा निवडणूक मतदारसंघातून पाठिंबा देण्यची मागणी केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. मिनल खतगावकर भाजपच्या माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सून आहेत. मिनल खतगावकर नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत. 2019 मध्ये विधानसभेला आणि 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. मात्र दोन्ही वेळेला त्यांना पक्षाच्या आदेशानंतर माघार घ्यावी लागली. काही महिन्यापूर्वी मिनल खतगावकर यांनी अमित शाहांची भेट घेतली होती. येत्या 29 तारखेला निर्णय घोषित करणार आहेत. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. तर धुळे सोलापूर महामार्गावर पैठण फाटा या ठिकाणी जरांगेंचं नवं संपर्क कार्यालय सुरू होतंय. याच ठिकाणी रणनिती ठरवली जाणार आहे.

विधानसभेला तिकीट मिळेल, अशी अपेक्षा खतगावकर यांना आहे. परंतु, तिथे शक्यता कमीच दिसत आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यातच बुधवारी खतगावकर यांनी जरांगे-पाटील यांची आंतरवाली-सराटी येथे भेट घेतली. जरांगे-पाटील यांनी इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांसह भेटीसाठी बोलावलं आहे. येत्या 29 ऑगस्टला 288 उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय जरांगे-पाटील घेणार आहेत. त्यातच पहिल्या दिवशी मीनल खतगावकर यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर लगेच त्यांनी तिकीट न भेटल्यास अपक्ष लढण्याचा पुनरूच्चार केला. त्यामुळे जरांगे-पाटील यांचा पहिला उमेदवार ठरला? अशी चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img