मुंबई
अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (v Shantaram Jivangaurav Purskar) तर ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम (V. Shantaram Award) विशेष योगदान पुरस्कार हा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक तसंच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर झाला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ही घोषणा केली आहे.
अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म 21 एप्रिल 1950 रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि मोठ्या पडद्यावरही काम केलंय. ‘सीआयडी’ ही त्यांची मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते बँकेत काम करायचे. मात्र त्यांना आधीपासूनच रंगमंचाची आवड होती. इंटर बँक स्टेज स्पर्धेतून त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन बाळ धुरी यांनी शिवाजी साटम यांना संगीत नाटकात मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी मालिकेत आणि चित्रपटांमध्ये काम केलं.