15.6 C
New York

Assembly Elections : ‘स्वराज्य’ची तिसऱ्या आघाडी; संभाजीराजे अन् जरांगे एकत्र येणार?

Published:

सोलापूर

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीने (Mahayuti) जोरदार तयारी सुरू केली. तर छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी तिसऱ्या आघाडीसाठी गोळाबेरीज सुरू केली. त्यांचा स्वराज्य पक्ष विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी मनोज जरांगे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. राजरत्न आंबेडकरांना (Rajaratna Ambedkar) सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. दरम्यान, जरांगेंशी (Manoj Jarange Patil) निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती लवकरच करणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अद्याप झाली नसली तर आम्ही ती करणार. जरांगे यांचा दृष्टीकोण आणि माझं उद्दिष्ट एकच आहे. त्यामुळे जरांगे यांच्याशी चर्चा करायला कुठलीच अडचण नाही. छत्रपती शाहू महाराजांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते अंमलात आणलं होतं. त्या आरक्षणासाठीच आम्ही दोघे लढत आहोत. त्यामुळे जरागेंना माझा नेहमीच सपोर्ट राहिला आणि राहिलं. जरांगेंशी लवकरच राजकीय चर्चा देखील होईल, असे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले की, महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार आहे.याबाबत लवकरच बैठक होणार आहे. आरक्षण देण्यापेक्षा आरक्षण कसं टिकेल यावर चर्चा होणे गरजेचे आहे. यापूर्वी दोनदा आरक्षण मिळालं पण ते टिकलं नाही. राज्यात मराठा-ओबोसी वाद होणार नाही, याची सर्वांना काळजी घ्यावी. राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, राजरत्न आंबेडकरांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न असल्याचं संभाजीराजे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img