24.6 C
New York

Dinkar Shinde Passed Away : गायक दिनकर शिंदे काळाच्या पडद्याआड

Published:

मुंबई

मराठी सिनेसृष्टीमध्ये तसेच अनेक संगीत प्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या शिंदे घराण्यातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाचा वारसा पुढे नेणारे आंनद शिंदे यांचे धाकटे बंधू गायक दिनकर प्रल्हाद शिंदे (Dinkar Shinde Passed Away) यांचे निधन झाले आहे. याबाबतची माहिती दिनकर यांचा पुतण्या तसेच आनंद शिंदेंचा मुलगा उत्कर्षने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली आहे.

गायक दिनकर शिंदे यांनी आंबेडकरी गीतांसह माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. दिनकर शिंदे यांनी गायलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या गाण्यांना त्यांच्या युट्युब चॅनेलवर लाखांच्या घरात व्ह्यूज आहेत. तसेच दिनकर शिंदे यांनी भाऊ आनंद शिंदे यांच्यासह अनेक गाणी रचून ऐंशी आणि नव्वदचा काळ गाजवला. यातील अनेक गाण्यांच्या सीडीजची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती. दिनकर शिंदे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच लोकगीतांमध्ये बहुमूल्य योगदान दिले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img