26.5 C
New York

Shravani Somvar : दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त कपर्दिकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

Published:

रमेश तांबे, ओतूर

भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ओतूर (Otur) येथील ग्रामदैवत, श्री कपर्दिकेश्वर (Kapardikeshwar Temple) दूसरा श्रावणी सोमवार (Shravani Somvar) यात्रे निमित्त दि.१२ रोजी हजारो भाविकांनी कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलींगावर तयार करण्यात आलेल्या तांदळाच्या कलात्मक पिंडीचे व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

दुसरा श्रावणी सोमवार निमित्त श्री कपर्दिकेश्‍वर मंदिरात शिवलिंगावर तांदळाच्या दोन कलात्मक पिंडी तयार करण्यात आल्या होत्या.पहाटे सहा वाजता विकास पानसरे, राजेंद्र हैलकर, रमेश कोल्हे, शरद चौधरी यांच्याहस्ते सपत्नीक महाअभिषेक, आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी पुजारी गोविंदराव डुंबरे, दत्तात्रय शिंदे, सागर  घोडेकर यांच्यासह नितीन तांबे, अमोल डुंबरे, सागर दाते, महेंद्र पानसरे, सचिन तांबे, जितेंद्र डुंबरे, राजेंद्र हांडे देशमुख, सतिश तांबे, विश्वासराव तांबे उपस्थीत होते.

रेणुका ज्वेलर्स गोरखनाथ गडदरे यांच्यावतीने भाविकांना खिचडी वाटप करण्यात आली.तसेच कपर्दिकेश्वर व चैतन्य स्विमिंग अँड वॉकिंग क्लब यांचे तर्फे दोन टन केळी व ५ हजार पुडे चिक्की वाटप तसेच नवोदित गणेश मंडळ वरील आळी यांचे तर्फे उपवास चिवडा व केळी वाटप करण्यात आले. युनिक हॉस्पिटल आळेफाटा यांचे तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते.

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रातील कर्मचारी यात्रेतील भाविकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी कार्यरत होते. दरवर्षी श्रावण महिन्यात श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडी तयार करण्यात येतात,पिंडींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त दरवर्षी ओतूरला येतात. दुसरा श्रावणी सोमवार दि.१२ रोजी सकाळी ९ ते ६ यावेळेत संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली असून,भाविकांनी बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला.ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img