11 C
New York

Ladki Bahin Yojana : फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचं ‘लाडकी बहीण’ योजनेवरुन वादग्रस्त विधान

Published:

अमरावती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यात लोकप्रिय ठरताना दिसत आहे. महिलांचा या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज मान्य करण्यात आले आहे. एकीकडे सत्ताधारी लोकांकडून या योजनेच्या प्रचारावर लाखो रुपये खर्च केले जात आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून एकीकडे योजनेवरुन सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच काही नेत्यांनी मात्र या योजनेचा फायदा करुन घेण्याचे ठरवले आहे.मात्र, अशातच आता महायुतीतील अपक्ष आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचे समजले जाणारे रवी राणा (Ravi Rana) यांनी लाडकी बहीण योजनेवरुन वादग्रस्त विधान केले आहे.

अमरावती येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण कार्यक्रमात आमदार रवी राणा बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले, राज्य सरकार या योजनेंतर्गत 1500 रुपये देत आहे. मात्र, लवकरच आम्ही ही रक्कम दुप्पट करणार आहोत. म्हणजेच ही रक्कम 3000 इतकी होणार आहे. राज्य सरकार देत आहे. पण, ज्याचं खाल्ल आहे त्याला जागलं पाहिजे. सरकार देत राहतं.. पण सरकारने दिले की त्यांना आशीर्वादही मिळायला हवा. जर मलाही आशीर्वाद मिळाला नाही तर मिळालेले 1500 रुपये भाऊ म्हणून काढून घेऊ, असेही राणा या वेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img