15.6 C
New York

Amdar Niwas : आकाशवाणी आमदार निवासाचा स्लॅब कोसळला, विक्रम सावंत बचावले

Published:

मुंबई

काँग्रेसचे (Congress) जत मतदारसंघाचे आमदार विक्रम सावंत (Vikram Sawant) यांच्या आकाशवाणी (Akashwani) आमदार निवासातील (Amdar Niwas) रूम नंबर 401 या रूमचा POP चा स्लॅब कोसळला आहे. आज रविवारचा दिवस असल्यामुळे आमदार विक्रम सावंत आणि त्यांचे स्विय सहाय्यक मतदारसंघात असल्यामुळे ते या दुर्घटनेतून बचावले आहेत.

आमदार निवासस्थानी काँग्रेसचे जत मतदारसंघाचे आमदार विक्रम सावंत यांच्या रूमच्या स्लॅब कोसळल्याची माहिती समोर येत आहे. आमदार विक्रम सावंत यांची रूम बंद होती, त्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. विक्रम सावंत हे काँग्रेसचे जत मतदारसंघाचे आमदार असून आकाशवाणी आमदार निवासात ते रूम नंबर 401 मध्ये असतात. या रूमचाच POP चा स्लॅब कोसळला आहे. आज शनिवार असल्यामुळे, आमदार विक्रम सावंत आणि त्यांचे स्विय सहाय्यक मतदारसंघात असल्यामुळे त्याचा रूम नंबर 401 हा बंद होता. सुदैवाने ते या दुर्घटनेतून बचावले आहेत. आकाशवाणी आमदार निवास ही 50 वर्षाहून अधिक जुनी असलेली इमारत आहे. त्याचे मेंटेनन्स हे बांधकाम विभागाच्या खात्यांतर्गत येतं. गेल्या काही दिवसापूर्वी देखील सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बाबू पाटील यांच्या आमदार निवासातील रूमचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार समोर आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img