26.5 C
New York

Chhagan bhujbal : ओबीसी एल्गार मेळाव्यातून भुजबळांचे मनोज जरांगेंना आवाहन, म्हणाले…

Published:

सांगली

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी आज सांगलीत ओबीसी महा एल्गार मेळाव्यात (OBC Melava) महत्त्वाचं वक्तव्य केलं. छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका केली. महायुतीचं सरकार आहे. मी तुम्हाला नक्की सांगतो. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देणं शक्य नाही म्हणजे नाही. ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. चार-चार आयोगांनी ते शक्य नसल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शक्य नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही 54 टक्के, बिहारमध्ये मोजले तर 63 टक्के निघाले, बाकीचे कमिशन वगैरे मी मानत नाही. मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 288 जागांपैकी 88 जागा लढवाव्यात आणि किमान 8 जागा तरी निवडून आणून दाखवाव्या, असे आव्हान भुजबळांनी मनोज जरांगे यांना दिले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण द्या, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका. मनोज जरांगे एका जातीचे नाव घेतात, एका जातीचे राजकारण करतात. माझ्याकडे 334 जाती आहेत. त्यांचे नेतृत्त्व मी करतो. तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव घेणार आणि हा तेली आहे, हा माळी आमदार आहे. शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली. त्यांच्यांवर पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांतील लोकांना एक करुन मावळे तयार केले. महाराजांबद्दल महत्त्मा फुलेंनी जे म्हटले होते, ते आता आपल्याला बरोबर घेऊन पुढे जावे लागणार आहे. मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 288 जागांपैकी 88 जागा लढवाव्यात आणि किमान 8 जागा तरी निवडून आणून दाखवाव्या, असे आव्हान भुजबळांनी मनोज जरांगे यांना दिले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, मी केंद्रातील चार विधिज्ञांशी बोललो आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. सगेसोयरे यांना तर देता येणारच नाही. घाईघाईने त्यावेळी सुप्रीम कोर्टात खानविलकर नावाचे जज बसले होते. त्यांनी 15 दिवसांत इम्पेरिकल डाटा आणि नाहीतर निवडणुका घ्या, असं म्हटलं. 92 नगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या, त्यात एकसुद्धा ओबीसी नाही. आम्ही 54 टक्के पेक्षा जास्त आहोत. तुम्ही मोजा. आम्ही 54 टक्के असून 27 टक्के आरक्षण दिलं आणि भरलं किती? 27 टक्के आरक्षणासमोर साडेनऊ टक्के आरक्षण भरलं. मग आमचा बॅकलॉग किती आहे? आमचा बॅकलॉग भरा मग वेगळ्या आरक्षणाचा विचार करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींना धक्का लागणार नाही म्हणून जाहीर केले आहे. तुम्हाला कोणीच ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. विचारा शरद पवार, उद्भव ठाकरे यांना, मराठ्यांना कोणीच ओबीसीमधून आरक्षण देणार नाही असं छगन भुजबळ म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img