20.4 C
New York

Raj Thackeray : हिंगोलीत राज ठाकरेंच्या स्वागतावेळी गोंधळ

Published:

हिंगोली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका (Assembly elections) आणि मराठा आरक्षणावरील (Maratha Reservation) त्यांची भूमिका त्यामुळे त्यांचा हा दौरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान आज नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांना भेटण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अशात हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात थांबलेल्या ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची तेथे झुंबड उडाल्याने स्टीलचा ग्रील तुटल्याचे पाहायला मिळाले. हे ग्रील तुटल्यानंतर कार्यकर्ते खाली कोसळले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img