26.5 C
New York

Mhada Lottery : मुंबईतील घराचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून लॉटरी जाहीर

Published:

मुंबई

मुंबईत हक्काच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (Mhada) मुंबईतील घरांसाठी मोठी सोडत जाहीर केली आहे. म्हाडा लॉटरी पद्धतीने (Mumbai Mhada Lottery) तब्बल 2030 घरांची विक्री करणार आहे. ही सगळी घरं मुंबईतील असणार आहेत. विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल- वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स – मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 घरांच्या विक्रीसाठी नुकतीच सोडत जाहीर करण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) मुंबईतील प्राईम लोकेशन्स म्हणून गणल्या जाणाऱ्या परिसरात परवडणाऱ्या दरात घर विकत घेण्याची संधी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात MHADA ने उपलब्ध करुन दिली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीचा कार्यक्रम म्हाडाने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केला. शुक्रवारपासून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर 13 सप्टेंबरला म्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाईल. म्हाडाच्या या लॉटरीत मुंबईतील तब्बल 2000 घरांचा समावेश असल्याने मुंबईकरांसाठी चांगली संधी चालून आली आहे. https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर या लॉटरीबाबत सर्व माहिती जाणून घेता येईल.

म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत. मुंबई उपनगरातील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत.

म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरूवात होईल. या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असून घरांच्या सोडतीबाबत माहिती देणारी पुस्तिका देखील वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img