नवी दिल्ली
कांदाप्रश्नी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) खासदारांनी आंदोलन केलंय. गळ्यात कांद्याच्या माळा घालून खासदारांनी संसदेच्या मकरद्वारावर घोषणा दिल्या आहेत. ‘शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा त्यांनी दिल्या आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा ही खासदारांची मागणी आहे.
कांद्याला 35 रुपये किलो भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राईस MSP मिळावी ही देखील त्यांची मागणी आहे. खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते, निलेश लंके, राजाभाऊ वाझे यांच्यासह इतर खासदार आंदोलनाला उपस्थित आहेत.