24.6 C
New York

Paris Olympics : भारताच्या हॉकी संघानं केली कमाल, स्पेनचा धुव्वा उडवत जिंकलं कांस्यपदक

Published:

भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील कांस्यपदकाचा सामना भारत (India) आणि स्पेन (Spain) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हरमनप्रीतसेनेने स्पेनला 2-1 ने नमवून सलग दुसऱ्यांदा कांस्यपदकावर (Bronze Medal) नाव कोरलं आहे. हे भारताचं या स्पर्धेतील चौथं कांस्यपदक ठरलं आहे. एकीकडे भारतीय खेळाडू जल्लोष साजरा करत होते. तर स्पेनच्या खेळाडूंना रडू कोसळलं.

फायनलमध्ये जाण्याची संधी हुकल्यानंतर भारतीय संघाने कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. या सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंकडून आक्रमक खेळ केला. या क्वार्टरमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. मात्र एकही गोल झाला नाही.

भारताने कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा 2-1 अशा फरकाने पराभव करत 14 वं ऑलिम्पिक पदक हॉकी संघाने पटकावलं आहे. या विजयासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकले आहे. याआधी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकले होते. भारतीय हॉकी संघाच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भारताने सलग दोनदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि संघाने या दिग्गज खेळाडूला यादगार निरोप दिला. भारताची भिंत म्हणून ओळखला जाणारा श्रीजेश टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या संघाचा भाग आहे. अशा प्रकारे भारताने ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेत १३ वे पदक जिंकले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img