17.6 C
New York

Bangladesh Crisis : विश्व हिंदू परिषद बांग्लादेशासोबत – सलेकर

Published:

रमेश औताडे, मुंबई

बांगलादेशच्या (Bangladesh) आर्थिक प्रगतीत अडथळा येऊ नये. त्यासाठी भारतीय समाज आणि सरकार बांगलादेशचे (Bangladesh Crisis) सहयोगी राहतील. बांगलादेशात लवकरात लवकर लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावे. तेथील समाजाला मानवी हक्क मिळायला हवेत असा विश्वास विश्व हिंदू परिषद् (Vishva Hindu Parishad), कोकण प्रान्त मंत्री मोहन सालेकर (Mohan Salekar) यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

बांगलादेश एका विचित्र अनिश्चिततेत, हिंसाचाराच्या आणि अराजकात अडकला आहे. हसीना सरकारने राजीनामा दिल्यानंतर आणि त्यांनी देश सोडल्यानंतर अंतरिम सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. संकटाच्या या काळात भारत बांगलादेशच्या संपूर्ण समाजाचा मित्र म्हणून खंबीरपणे उभा आहे असे सालेकर म्हणाले.

यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता श्रीराज नायर, म्हणाले की बांगलादेशात हिंदूंची घरे, दुकाने, कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठान, महिला, मुले आणि अगदी मंदिरे आणि गुरुद्वारा, त्यांची श्रद्धा केंद्रेही सुरक्षित नाहीत. तिथल्या अत्याचारित अल्पसंख्याकांची स्थिती अतिशय वाईट होत चालली आहे, ही स्थिती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी आणि मानवी हक्कांसाठी प्रभावी पावले उचलणे ही जागतिक समुदायाची जबाबदारी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img