17.6 C
New York

Ravi Rana : अडसूळांचे मानसिक संतुलन बिघडले, रवी राणांचे टीकास्त्र

Published:

अमरावती

शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि भाजप यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. राज्यपालपदासाठी आठ-दहा दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणा (Navneet Rana) यांचं जातवैधता प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार, असा इशारा अडसूळ यांनी दिला. त्यावरून रवी राणांनी (Ravi Rana) अडसूळ यांच्यावर जोरदार टीका केली. अडसूळ यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांच्यावर उपचार करावे, त्याचा खर्च मी करतो, अशा शब्दात राणांनी अडसूळ यांच्यावर निशाणा साधला.

रवी राणा म्हणाले की, अडसूळ यांच्याविषयी विचारले असता राणा म्हणाले की, आनंदराव अडसूळ यांचे मानसिक संतुलन सध्या बिघडलेले आहे. त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे. ते आज आम्हाला ब्लॅकमेल करत आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे नाव गेऊन ते आम्हाला ब्लॅकमेल करत आहेत. त्यांनी अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी शेवटपर्यंत विरोधात काम केलं. त्यांनी नवनीत राणांना पाडण्यासाठी त्यांची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. नवनीत राणा यांना विजयी करण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. मात्र, त्यांनी आपली शब्द पाळला नाही, असं राणा म्हणाले.

रवी राणा म्हणाले की, राज्यपालपद आणि इतर मागणी करून त्यांनी स्वत:चे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना आरामाची गरज आहे. त्यांनाही चांगला डॉक्टर आणि चांगल्या उपचारांची देखील गरज आहे. त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडून आणि चांगल्या रुग्णालयात उपचार ग्यावात. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च मी करतो, अशा तिखट शब्दात आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img