15.6 C
New York

Dombivli : पालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या इमारतीला गळती

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र (KDMC) कार्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंतीला पाण्याची गळती लागल्याने कर्मचारी पुरते हैराण झाले आहे. कामानिमित्त या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी हे दृश्य पाहून पालिका प्रशासन का लक्ष देत नाही असा प्रश्न पडला आहे.

2003 साली डोंबिवली पश्चिमेकडील दोन टाकीजवळ पालिकेची ‘ह’प्रभाग क्षेत्र कार्यालयाची तळ अधिक दोन मजली इमारती उभी करण्यात आली. तब्बल 20 वर्षानंतर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंतीला पाणी गळती लागली. पावसाळ्यात काम करणे मुश्किल होत असल्याने कर्मचारीवर्ग आणि नागरिक पुरते वैतागले आहेत.पालिका प्रशासनाचे इमारतीकडे लक्ष देत नसल्याने अशी अवस्था झाल्याचे नागरिक बोलत आहेत.

या परिस्थितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली पश्चिम उपशहर संघटक संजय पाटील म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इमारतीची अशी अवस्था झाली आहे. त पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या अवस्थेत काम करावे लागत असेल तर याच्यावरून शोकांतिका काय असेल. मग त्यांचं महानगरपालिकेचे काम कसं होत असेल याचीच जाणीव होत आहे. अशा स्मार्ट महानगरपालिकेकडून लोकांनी कसली अपेक्षा ठेवणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटी मध्ये गणना होते मग हीच का स्मार्ट सिटी?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img