11 C
New York

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ तारखेला पैसे होणार जमा!

Published:

मुंबई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍णींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. त्यातच, आता, लाडक्या बहि‍णींसाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. त्यानुसार, 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनापूर्वीच (Rakshabandhan) बहि‍णींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

लाडकी बहीण योजनेतून मिळणारे 1500 रुपये कधी मिळणार, याची उत्सुकता महिलांना होती. या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे. मात्र, या योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होतील, असे सांगितले जात होते. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार यावर निर्णय घेणात आला. रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे. मात्र, त्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्या दोन दिवस आधीच म्हणजे 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच लाडक्या बहि‍णींना पैसे मिळतील. विशेष म्हणजे दोन महिन्याचे पैसे एकत्र देण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. या योजनेतून पैसे देण्यासाठी सरकारकडून विशेष कार्यक्रम आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री शिंदे एका क्लिकवर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img