20.6 C
New York

Pooja Khedkar : ‘यूपीएससी’ने रद्द केलेल्या नियुक्तीविरोधात पूजा खेडकर यांची हायकोर्टात धाव

Published:

नवी दिल्ली

प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS)अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या कारनाम्यांची चर्चा महाराष्ट्रभर झाली. प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांचा शाही थाट समोर आल्यानंतर त्यांच्याबाबतचे रोज नवनवे खुलासे समोर आले. UPSC परीक्षा देताना सादर केलेलं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तसेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे संशयाच्या भोवऱ्यात आलं. या सर्व प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. यानंतर यूपीएससीने (UPSC) मोठा निर्णय घेत त्यांचं आयएएस पद तात्पुरते रद्द करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयाच्या विरोधात पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

जा खेडकर हिचे विविध प्रकरण उघड झाले होते. पूजा खेडकर हिचे अपंग प्रमाणपत्र, वडील निवृत्त आयएएस असताना घेतलेले क्रिमिलेअर प्रमाणपत्र यावरुन वादळ उठले. पूजा खेडकर विरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर यूपीएससीने चौकशी करुन तिने फसवणूक केल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले. यामुळे तिची उमेदवारी रद्द केली. आता पूजा खेडकर उच्च न्यायालयात पोहचली आहे. तिने याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा काही दिवस चर्चेत राहणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img