15.6 C
New York

Anil Deshmukh : खळबळजनक दावा, परमबीर सिंग अन् फडणवीस यांच्यात ‘ती’डील’

Published:

मुंबई

राज्याचे सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. दोघेही एकमेकांवर मोठ मोठे आरोप करत आहेत. अशात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर आरोपाचा आणखी एक बॉम्ब फोडला आहे. माझ्यावर आरोप करण्यासाठी तत्कालीन मुंबईचे पोलिस आयुक्त (Parambir Singh) आणि फडणवीस यांच्यात एक डील झाले होते असा दावा देशमुख यांनी आज केला.

फडणवीस आणि देशमुख यांच्यातील शाब्दिक वाद नागपूरच्या फोस्टरवर झळकला आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज देशमुख यांनी नव्या वादाला तोंड फोडले. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत बॉम्ब ठेवणाऱ्या गाडी मालकाची हत्या झाली. त्या घटनेचा मास्टर माईंड परमबीर सिंग होते. त्यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले. त्यातून माझ्यावर आरोप लावण्याचे डील दोघांमध्ये झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.

चांदीवाल आयोगाबाबत बोलताना फडणवीस यांनी तो अहवाल महाविकास आघाडीचे सरकार असताना आला होता. त्याच दरम्यान आमचे सरकार पाडण्यात आले. प्रत्येकाला ५० खोके देऊन सरकार भाजपने पाडले. त्यामुळे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सादर केलेला अहवाल जाहीर होऊ शकला नाही. तो दोन वर्षांपासून गृह खात्याकडे पडून आहे. देवेंद्र फडणवीस या खात्याचे प्रमुख आहेत. आपण यापूर्वी सुद्धा चांदीवाल आयोग जाहीर करण्याची विनंती दोन वेळा केली. मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. हा अहवाल सादर झाला तेव्हा माध्यमांनी आपल्याला क्लिनचिट दिल्याच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. कदाचित याच कारणामुळे तो जाहीर केला जात नसल्याची शंका अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img